Type Here to Get Search Results !

Jio च्या ‘या’ ३ स्वस्त प्रीपेड प्लान्सवर मिळत आहे कॅशबॅक ऑफर, डेटा-कॉलिंगचाही मिळेल फायदा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी प्रीपेड प्लान्सवर कॅशबॅक ऑफरची घोषणा केली होती. ही ऑफर आताही सुरू असून, ग्राहक या प्लान्सला अ‍ॅप अथवा वेबसाइटवरून अ‍ॅक्सेस करू शकतात. वाचा: जिओची कॅशबॅक ऑफर २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानवर आहे. ग्राहकांना या प्लान्सवर क्रमशः ५० रुपये, १११ रुपये आणि १२० रुपये कॅशबॅक मिळेल. त्यामुळे या प्लान्सची किंमत क्रमशः १९९ रुपये, ४४४ रुपये आणि ४७९ रुपये होते. या प्रीपेड प्लान्सवर ग्राहकांना २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. या कॅशबॅकचा वापर ग्राहक Mart, Reliance Digital, Jio रिचार्ज व इतर सर्व्हिसेजसाठी करू शकतील. जिओच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानची वैधता २८ दिवस आहे. याचप्रमाणे ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. ५९९ रुपयांच्या प्लानबद्दल सांगायचे तर ग्राहकांना यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. वरील सर्व प्लानमध्ये आणि सारख्या जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HhcUDI
https://ift.tt/2YKrCBK
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.