Type Here to Get Search Results !

iPhone 12 Mini Offers : खूपच कमी किमतीत खरेदी करा iPhone 12 Mini, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Apple फ्लॅगशिप फोनसाठी ओळखले जाते. Apple ने अलीकडे नवीन 13 iPhone सीरीज अंतर्गत 4 iPhone लाँच केले आहेत. अशा स्थितीत आधीपासून बाजारात असलेल्या मालिकांच्या किमती कमी झाल्या आहेत. Apple ई-कॉमर्स साइट Flipkart वर बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल. पाहा डिटेल्स. वाचा: ऑफर आणि किंमत: ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, Apple iPhone 12 Mini चा ६४ GB व्हेरिएंट फक्त ४७,६९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. त्याची वास्तविक किंमत ५९,९०० रुपये आहे. म्हणजेच त्यावर २० टक्के सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या iPhone वर १४,२५० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. एक्सचेंज ऑफरचा समावेश केल्यास, iPhone 12 Mini ची किंमत ३३,४४९ रुपये होईल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स: Apple iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या iPhone मध्ये ४ GB RAM आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज आहे. तर, १२ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, दुसरा १२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या iPhone मध्ये १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा iPhone IP68 रेटिंगसह येतो, जो याला पाण्यापासून संरक्षण देतो. कंपनी या आयफोनसोबत १ वर्षाची वॉरंटी देते. iPhone हेक्सा कोर Apple A14 Bionic वर काम करत असून iOS 14 वर ऑपरेट करतो. आयफोनमध्ये फेस अनलॉक, 3D फेस रेकग्निशन, कंपास/मॅग्नेटोमीटर सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, गायरोस्कोप सेन्सर आणि बॅरोमीटर सेन्सर आहेत. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात WiFi, GPS, Bluetooth v 5.00, NFC, लाइटनिंग केबल, हेडफोन आणि ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qFl6Ys
https://ift.tt/2YOsfKs
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.