Type Here to Get Search Results !

Infinix Note 11i: ४८MP कॅमेऱ्यासह लाँच झाला इनफिनिक्सचा शानदार स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : इनफिनिक्सने आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत या हँडसेटला लाँच केले आहे. कंपनीने या फोनला लाँच नायजेरियामध्ये लाँच केले असून, याची किंमत ९७९ GHS (जवळपास ११,९०० रुपये) आहे. फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. फुल एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. पाहा: Infinix Note 11i चे स्पेसिफिकेशन्स Note 11i स्मार्टफोनमध्ये १०८०x२४६० पिक्सल रिझॉल्यूशन ६.९५ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०.५:९ आणि टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेट मिळते. तर फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली आहे. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. साइड फिंगरप्रिंट सेंसरसह येणाऱ्या या फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित XOS ७.६ UI वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल ४जी VoLTE, वाय-फाय ८०२.११ ac, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. पाहा: पाहा: पाहा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30sRJOp
https://ift.tt/3cd0pec
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.