Type Here to Get Search Results !

१०८ मेगापिक्सल कॅमेराचा रियलमीचा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, पाहा किती असू शकते किंमत

नवी दिल्लीः टेक कंपनी रियलमी सध्या आपल्या नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन वर काम करीत आहे. फोनची लाँचिंग डेट संबंधी कंपनीकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यादरम्यान, टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने या अपकमिंग स्मार्टफोनच्या लाँचिंग डेट आणि किंमतीचा खुलासा केला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनी या फोनला पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच करू शकते. याची किंमत ४०० युआन म्हणजेच जवळपास ४६ हजार ५०० रुपये असण्याची शक्यता आहे. मिळू शकतात हे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५१ इंचाचा फुल एचडी प्लस Super AMOLED डिस्प्ले दिला जावू शकतो. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ असेल. तसेच हाय रिफ्रेश रेट सोबत येईल. रियलमीचा हा फोन कमीत कमी ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येवू शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस ५जी चिपसेट ऑफर करू शकते. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेराचा समावेश असू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा पाहायला मिळू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. जी ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये अँड्रॉयड १२ दिले जावू शकते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ५जी, वाय फाय, ब्लूटूथ ५.१ जीपीएस, एनएफसी, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिले जावू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bQLDJy
https://ift.tt/3H6dfcm
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.