Type Here to Get Search Results !

वोडाफोन आयडियाचे सर्वात स्वस्त प्लान्समध्ये डेटा सोबत फ्री कॉलिंग, किंमत ९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Vi म्हणजेच वोडाफोन आयडिया यूजर्सला अनेक शानदार प्लान ऑफर करीत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत अनेक असे प्लान आहेत. जे खूपच कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंगची सुविधा देतात. जर तुम्हालाही कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंग हवी असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी याची सविस्तर माहिती देत आहोत. वोडाफोनचे सर्वात स्वस्त परंतु, बेस्ट प्लान्स संबंधी ही माहिती जाणून घ्या. ९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत येणाऱ्या या प्लानमध्ये फ्री कॉलिंग सोबत अतिरिक्त बेनिफिट सुद्धा मिळतील. वोडाफोनचा ९९ रुपयाचा प्रीपेड प्लान वोडाफोनचा हा प्लान १८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी २०० एमबी डेटा देत आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात देशात कोणत्याही नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये फ्री एसएमएसची सुविधा दिली जात नाही. वोडाफोनचा १०९ रुपयाचा प्रीपेड प्लान कंपनीचा हा प्लान २० दिवसाच्या वैधते सोबत येतो. इंटरनेट यूज करण्यासाठी या प्लानमध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये फ्री एसएमएसची सुविधा मिळत नाही. परंतु, हा प्लान तुम्हाला ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देतो. वोडाफोनचा १२९ रुपयाचा प्रीपेड प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये पूर्ण वैधतेच्या पीरियड साठी १ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. २४ दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी देशात सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात ३०० एसएमएस फ्री मिळतात. वोडाफोनचा १४९ रुपयाचा प्रीपेड प्लान वोडाफोनचा हा प्रीपेड प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. प्लानमध्ये कंपनी यूजर्संना २ जीबी डेटा एक्स्ट्रा देत आहे. एक्स्ट्रा डेटासाठी तुम्हाला वोडाफोन आयडियाच्या अॅप किंवा वेब रिचार्ज करावा लागेल. ३०० फ्री एसएमएससह या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट् मध्ये Vi Movies & TV अॅपचे फ्री अॅक्सेसचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bV1tmC
https://ift.tt/3C2ExfY
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.