Type Here to Get Search Results !

Amazon Deal: LG च्या १४ इंच लॅपटॉपवर आकर्षक ऑफर, मिळेल तब्बल ५२ हजारांची सूट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून एलजीच्या १४ इंच लॅपटॉपला स्वस्तात खरेदीची संधी आहे. या लॅपटॉपवर तब्बल ५२ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. शानदार फीचर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये लेटेस्ट प्रोसेसर दिला असून, याचे वजन १ किलोपेक्षा कमी आहे. लॅपटॉपच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: 11th Gen Core i7 एलजीच्या या १४ इंच लॅपटॉपची किंमत १,४०,००० रुपये असून, तब्बल ५२ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा ८७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या लॅपटॉपवर तब्बल १८,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफर जुन्या लॅपटॉपच्या कंडिशनवर अवलंबून आहे. लॅपटॉपला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. स्पेसिफिकेशन एलजीचा हा १४ इंच लॅपटॉप वजनला खूपच हलका असून, याचे वजन १ किलोपेक्षा कमी आहे. सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी यात फिंगर प्रिंट सेंसर दिला आहे. लॅपटॉप विंडोज १० ओएसवर काम करतो. यात लेटेस्ट Intel ११th Gen Core i७-११६५G७ प्रोसेसरसह १६ जीबी LPDDR4X (ऑनबोर्ड) आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये २ यूएसबी पोर्ट आणि एक एचडीएमआय पोर्ट मिळतो. सोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे. लॅपटॉपमध्ये Magnesium Alloy - ७२Wh बॅटरी दिली आहे, जी १९ तास टिकते. तर स्टँड बायवर २५ तास टिकते. यात ऑडिओसाठी स्टीरियो स्पीकर दिले आहे. यामध्ये DTS:X Ultra सह ३D Audio Rendering फीचर दिले असून, यामुळे विना हेडफोन देखील चांगला आवाज येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oT8nip
https://ift.tt/3rkr2Xp
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.