नवी दिल्ली : ने पेमेंट मोडचा उपयोग अधिकाधिक वाढवण्यासाठी पेमेंटशी संबंधित स्टिकर्स सादर केले आहेत. WhatsApp ने पेमेंट स्टीकर्सची नवीन रेंज लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, जे यूजर्सला द्वारे प्लॅटफॉर्मवर पेमेंटमध्ये स्पेशल स्टिकर जोडण्यास सक्षम बनवेल. आता अखेर व्हॉट्सअॅपने पेमेंट्स इन-अॅप स्टिकर्स लाँच केले आहेत. वाचा: WhatsApp चे म्हणणे आहे की, हे स्टिकर्स पैशांच्या व्यवहाराशी संबंधित वेगवेगळ्या क्लचरल एक्सप्रेशन्सवर आधारित आहेत. कंपनीने भारतात स्टिकर्स पॅकला लाँच करण्यासाठी पाच प्रसिद्ध भारतीय महिला कलाकार/चित्रकारांना देखील सोबत घेतले आहे. WhatsApp Payment स्टिकर्स पाठवण्याची पद्धत
- ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट उघडा.
- आता पेमेंट्स आयकॉनवर टॅप करा.
- आता जी रक्कम टाकायची आहे ती नमूद करा.
- आता Add a Note मेसेज बारमध्ये इमोजी आयकॉनवर टॅप करा.
- त्यानंतर 'पिक अ स्टिकर' आयकॉनवर टॅप करा.
- यातील एक स्टिकर निवडू शकता.
- आता टॅप करून पेमेंट पाठवू शकता.
- यासाठी तुम्हाला यूपीआय पिन टाकावा लागेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C3v4pr
https://ift.tt/3EofV2X

