Type Here to Get Search Results !

Voltas कडून 'ग्रँड महोत्सव' ऑफर; स्प्लिट, इंवर्टर आणि विंडो AC वर धमाकेदार डील्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: भारतीय घरगुती उपकरण उत्पादक Voltas ने आपल्या ग्राहकांसाठी या उत्सवाच्या काळात एक आश्चर्यकारक ग्रँड महोत्सव ऑफर २०२१ सुरू केला असून त्यात वर अनेक डील्स देण्यात येत आहेत. तुम्ही १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या सेलचा लाभ घेण्यासाठी व्होल्टास कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेल्या देशभरातील कोणत्याही दुकानात तुम्ही जाऊ शकता. कंपनी या ऑफरमध्ये एक्सचेंज संधी, बँक ऑफर आणि वॉरंटी सारख्या सुविधा देत आहे. वाचा: AC वर एक्सचेंज ऑफर उपलब्ध : विक्री वाढवण्यासाठी आणि लोकांना AC खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी व्होल्टासने या भव्य महोत्सव ऑफरमध्ये एक्सचेंज ऑफरची सुविधा ठेवली आहे. ग्राहकांना हवे असल्यास, ते त्यांच्या जुन्या AC ऐवजी नवीन खरेदी करू शकतात आणि सूट देखील मिळवू शकतात. इच्छित असल्यास, आपण व्होल्टासच्या सर्व विंडो , इन्व्हर्टर आणि स्प्लिट एसीवर हा लाभ घेऊ शकता.या ऑफरचा कोणताही लाभ घेण्यासाठी, तुम्हाला अधिकृत व्होल्टास चॅनेल भागीदारांकडून किंवा विशेष व्होल्टास स्टोअरद्वारेच खरेदी करावी लागेल. वॉरंटी आणि बँक ऑफर : या सेलमध्ये १२ हजार रुपयांपर्यंत पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळत आहे . कंपनी स्प्लिट एसी इंस्टॉलेशनवर देखील ऑफर देत आहे, ज्यामध्ये ग्राहकाला फक्त ५९९ रुपये भरावे लागेल. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापरावर तुम्ही १५ % पर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. सोबतच, तुम्हाला NBFCs द्वारे २,००० रुपयांपर्यंत EMI फायनान्स ऑफर देखील मिळू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/305vT2Y
https://ift.tt/3mwnBbR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.