Type Here to Get Search Results !

Viचे जबरदस्त प्रीपेड प्लान, रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत डिज्नी+ हॉटस्टार, ४८ जीबीपर्यंत एक्स्ट्रा डेटा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) यूजर्संना शानदार बेनिफिट्सचे अनेक प्लान ऑफर करीत आहे. यात मिळणाऱ्या बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट शिवाय, वोडाफोन कंपनी काही प्रीपेड प्लानला जबरदस्त ओटीटी बेनिफिट्ससाठी ओळखले जातात. जाणून घ्या वोडाफोन आयडियाच्या काही खास प्लान संबंधी. ५०१ रुपयाचा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये तुम्हाला रोज १०० फ्री एसएमएस सोबत देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी यात १६ जीबी एक्स्ट्रा डेटा सोबत एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा देत आहे. याशिवाय, या प्लानमध्ये तुम्हाला विकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाइट बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. ७०१ रुपयाचा प्लान वोडाफोनच्या या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट यूज करण्यासाठी रोज ३ जीबी डेटा मिळेल. ५६ दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी ३२ जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट मध्ये एक वर्षाचे डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन सोबत बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरचा समावेश आहे. ९०१ रुपयाचा प्लान ८४ दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये कंपनी ४८ जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा फ्री मध्ये देते. या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. हा प्लान एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर सारखे बेनिफिट्स देत आहे. ६०१ रुपयाचा प्लान कंपनीचा हा प्लान वरच्या प्लान पेक्षा वेगळा आहे. हा एक डेटा पॅक आहे. यात तुम्हाला फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार नाही. प्लानमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी एकूण ७५ जीबी डेटा देत आहे. ५६ दिवसाच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार चे वर्षभरासाठी फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GaTbVQ
https://ift.tt/3G8Z85y
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.