Type Here to Get Search Results !

मस्तच! Sony च्या ५५ इंचच्या स्मार्ट TV वर तब्बल ३७ हजारांपर्यंतची जबरदस्त सूट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली : तुम्हाला जर मोठा आणि चांगला TV खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. सध्या मध्ये टीव्ही मॉडेल्सवर ६५ टक्के सूट देखील दिली जात आहे. यासह, येथे ग्राहकांना अतिरिक्त बँक सवलतीचा लाभ देखील घेता येईल. जाणून घ्या मोठ्या सवलतीत उपलब्ध असलेल्या Sony Bravia 55-inch 4K Smart TV ऑफरबद्दल. वाचा: Sony Bravia 55-inch 4K Smart ची किंमत १,०९,९०० रुपये आहे. परंतु, Amazon Great Indian Festival मध्ये हे डिव्हाईस तुम्ही ७२,९९० रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच, तब्बल ३६,९१० रुपयांची मोठी सूट. तसेच, अॅक्सिस आणि सिटीबँक वापरकर्ते क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांद्वारे अधिक सूट घेऊ शकतात. ग्राहक क्रेडिट आणि डेबिट नॉन-ईएमआय व्यवहारांवर १,००० रुपये आणि ईएमआय व्यवहारांवर १,२५० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. या बँक ऑफर १७ ऑक्टोबर पर्यंत वैध आहेत. Sony Bravia 55-inch 4K Smart बद्दल बोलायचे झाले तर, हा कमीत कमी बेजल्स असलेला एक बारीक टीव्ही आहे. यात ५५ इंचाचे LED पॅनल ३,८४० x २,१६० पिक्सेलसह मिळते. हा डिस्प्ले HDR १० आणि डॉल्बी व्हिजन प्रमाणित आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसह २० डब्ल्यू स्टीरिओ स्पीकर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी , यात चार एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ ४.२ चे समर्थन आहे. तसेच, हा टीव्ही गुगल असिस्टंट, अलेक्सा, Apple एअरप्ले आणि इनबिल्ट क्रोमकास्टला सपोर्ट करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vg4wyy
https://ift.tt/3aKxqxA
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.