नवी दिल्लीः रेडमी आपल्या होम मार्केटमध्ये २८ ऑक्टोबरला नवीन रेडमी नोट ११ स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. कंपनी चीनमध्ये या सीरीजचे खास फीचर्सला एक एक करून ग्राहकांसमोर आणणार आहे. ताज्या पोस्टर मध्ये रेडमी ने स्मार्टफोन्स मध्ये मिळणाऱ्या चार्जिंग स्पीडचा खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले की, Note सीरीज अंतर्गत 120W फास्ट चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे. कोणत्या मॉडलमध्ये मिळेल हे फीचर कंपनीच्या पोस्टरमध्ये दाखवले की नोट ११ सीरीजचा हा फोन 120W रॅपिड चार्जिंग सपोर्ट करीत आहे. ही शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. कंपनीने आतापर्यंत आपल्या फ्लॅगशीप डिव्हाइसेजवर 120W चार्जिंग ऑफर करीत आहे. सीरीजच्या अंतर्गत तीन मॉडल Redmi Note 11, Note 11 Pro, आणि Note 11 Pro+ लाँच करण्याची शक्यता आहे. असे मानले जात आहे की, 120W फास्ट चार्जिंग सीरीज मध्ये फक्त टॉप मॉडल Note 11 Pro+ मध्ये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Redmi Note 11 Pro+ चे संभावित स्पेसिफिकेशंस अफवेनुसार, रेडमी नोट 11 प्रो+ जवळपास नोट ११ प्रो सारखाच असेल. प्रो मॉडल डायमेंशन 920 प्रोसेसर आणि 67W फास्ट चार्जिंग सोबत येण्याची शक्यता आहे. तर प्रो प्लस व्हेरियंट मध्ये चिपसेट आणि फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळू शकते. रिपोर्टनुसार, Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोन मध्ये 120Hz चा AMOLED डिस्प्ले, डायमेंसिटी 1200 चिपसेट, LPDDR4x रॅम, UFS 3.1 स्टोरेज आणि 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्टचा समावेश आहे. तर यात सेल्फीसीठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. हा ड्युअल स्पीकर एक्स अॅक्सिस लीनियर मोटर, एक आयआर ब्लास्टर आणि एनएफसी सारखी अन्य सुविधे सोबत येईल. हा फोन तीन व्हेरियंट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pCPK4a
https://ift.tt/3mbCjpP

