Type Here to Get Search Results !

भारतात ‘एवढी’ असेल OnePlus 9RT स्मार्टफोनची किंमत, लवकरच होणार लाँच; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ची भारतातील किंमत अधिकृत लाँचिंगच्याआधी समोर आली आहे. स्मार्टफोनला याच आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यामुळे या फोनची लवकरच भारतात एंट्री होण्याची शक्यता आहे. फोनला 9R चे अपग्रेड व्हर्जन म्हणून सादर केले जाईल. हा फोन स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आणि ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सारख्या फीचर्ससह येतो. वाचाः टिप्स्टर योगेश बरारने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 9RT ची भारतात किंमत ४० ते ४४ हजार रुपये असू शकते. या फोनला च्या किंमतीत भारतात लाँच केले जाईल. OnePlus 8T च्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४२,९९९ रुपये आणि १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४५,९९९ रुपये आहे. याच आठवड्यात OnePlus 9RT ला चीनमंध्ये लाँच केले आहे. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३,२९९ CNY (जवळपास ३८,४०० रुपये) आहे. ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३,४९९ CNY (जवळपास ४०,८०० रुपये) आणि १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३,७९९ CNY (जवळपास ४४,२०० रुपये) आहे. ९आरटी या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होऊ शकतो. फोनला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सवर स्पॉट करण्यात आले आहे. मात्र, कंपनीने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. OnePlus 9RT च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यात अँड्राइड ११ आधारित ColorOS, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६२ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) सॅमसंग ई४ एमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, ४५०० एमएएचची बॅटरी आणि Warp Charge ६५T फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aY9CGF
https://ift.tt/3n2pGMU
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.