Type Here to Get Search Results !

Noise Sense नेकबँड भारतात लाँच, फक्त १,०९९ रुपयात खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : ने आपल्या सीरिजचा विस्तार करत नवीन ला लाँच केले आहे. Noise Sense हे दोन कलर्स आणि १० एमएम ड्रायव्हर्ससह येतात. Noise Sense मध्ये इनकमिंग कॉल अलर्टसाठी वायब्रेशन दिले आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे. या नेकबँडमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. वाचा: Noise Sense ची किंमत Noise Sense ची मूळ किंमत २,४९९ रुपये आहे. मात्र, स्पेशल ऑफर अंतर्गत १,०९९ रुपयात खरेदी करू शकता. कंपनीने ही स्पेशल ऑफर कधीपर्यंत आहे याची माहिती दिलेली नाही. Noise Sense ला ब्लॅक आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता. याची विक्री आणि Noise च्या वेबसाइटच्या माध्यमातून होईल. Noise Sense चे स्पेसिफिकेशन्स Noise Sense मध्ये १०mm चे ड्रायव्हर दिले आहेत. याशिवाय कॉलिंगसाठी इनबिल्ट माइक मिळतो. नेकबँडचे वैशिष्ट्यं म्हणजे यात कॉल रिजेक्ट, वॉल्यूम आणि म्यूझिक कंट्रोलसाठी टच सपोर्ट दिला आहे. यात कोणतेही फिजिकल बटन नाही. Noise च्या या नवीन नेकबँडमध्ये मॅग्नेटिक इयरबड्स दिले आहेत, जे वापर होत नसताना एकमेकांना चिकटतात. या नेकबँडसह गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. तसेच, एकाचवेळी दोन डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की, ८ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ८ तासांचा बॅकअप मिळेल. फुल चार्जमध्ये २५ तासांचा बॅकअप मिळतो. याचे वजन ३० ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Zd71Gb
https://ift.tt/3E7Shrg
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.