Type Here to Get Search Results !

Lenovo ने गुपचूपपणे लाँच केला मोठ्या स्क्रीनचा जबरदस्त लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : ने भारतात IdeaPad Series ला अपडेट केले होते. आता कंपनीने चीनमध्ये योग सीरिजमधील नवीन लॅपटॉपला सादर केले आहे. कंपनीने YOGA-सीरिजमध्ये लॅपटॉपला लाँच केले आहे. यामध्ये १६ इंचाचा स्लिम-बेझल डिस्प्ले दिला आहे. या लॅपटॉपच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Lenovo YOGA 16s लेनोवोने गुपचूपपणे या लॅपटॉपला लाँच केले आहे. कंपनीने विबोवर याबाबतची माहिती दिली. या नोटबुकच्या किंमत व उपलब्धतेबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच चीनमध्ये अधिकृत वेबसाइट्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होईल. Lenovo YOGA 16s चे फीचर्स Lenovo YOGA 16s एक स्लिम असून, यात २५६०x१६०० पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा १६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात ५०० निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर सपोर्टसह स्लिम-बेझल डिझाइन दिले आहे. डिस्प्ले १०० टक्के sRGB कलर गेमुट सपोर्ट करतो. लॅपटॉपच्या स्टोरेजबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. लेनोवोने याआधी YOGA 13s ला १३ इंच पॅनेल आणि Ryzen ५ प्रोसेसरसह लाँच केले होते. त्यामुळे YOGA 16s ला देखील Ryzen चिपसेटसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याचे इंटेल व्हेरिएंट देखील लाँच केले जाऊ शकते. Lenovo YOGA 13s चे स्पेसिफिकेशन्स Lenovo YOGA 13s मध्ये १३ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २५६०x1600 पिक्सल आहे. यात १६ जीबी DDR४ रॅम आणि ५१२ जीबी एसडीडी स्टोरेजसह AMD Ryzen ५ ५६००U चिपसेट दिला आहे. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५० Wh ची बॅटरी मिळते. Lenovo YOGA 13s चे अन्य फीचर्स यामध्ये डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट दिला आहे. तसेच, स्टीरियो स्पीकर सेटअप मिळतात. लॅपटॉपमध्ये वाय-फाय ६, एक ३.५ एमएम हेडफोन जॅक, दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहेत. तसेच, विंडोज हॅलोच्या मदतीने फेशियल ऑथेंटिकेशनचा देखील सपोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AsJAFK
https://ift.tt/30j0dY9
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.