Type Here to Get Search Results !

Jio ची खास भेट, फ्री मिळेल २८ दिवसाचा प्लान, फक्त हे काम करावे लागणार

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त भेट घेवून आली आहे. कंपनीने एक रेफरल कोड ‘JioTogether’ ला लाँच केले आहे. याचा वापर नवीन जिओ प्रीपेड कनेक्शन आणि जिओ मध्ये पोर्ट केल्यानंतर केले जावू शकणार आहे. जिओ वेबसाइटच्या माहितीनुसार, या ऑफर अंतर्गत रेफर करणाऱ्या आणि रेफर होणाऱ्या दोघांनाही ९८ रुपये आणि ३४९ रुपयाचे फ्री रिचार्ज व्हाउचर्स दिले जाणार आहेत. जिओ वेगवेगळ्या ब्रँड्सच्या २ हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त डिस्काउंट व्हाउचर सुद्ध देणार आहे. जास्तीत जास्त रेफरल मिळवण्यासाठी कंपनी ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त किंमतीचे व्हाउचर देईल. तुमच्या आधी रेफरल वर तुम्हाला ९८ रुपयाचा फ्री रिचार्ज मिळेल. ज्यात रोज १.५ जीबी डेटा आणि १४ दिवसासाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याच प्रमाणे १२ वे रेफरल वर तुम्हाला ३४९ रुपयाच्या सहा व्हाउचर मिळतील. प्रत्येक एका व्हाउचरमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा आणि २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. असा उठवा ऑफरचा लाभ ही ऑफर १२ ऑक्टोबर पासून लाइव्ह आहे. जिओची ही ऑफर टप्प्याटप्प्याने रोलआउट केली जात आहे. योग्य ग्राहकांना रिलायन्स जिओकडून एक व्हिडिओ पाठवला जात आहे. हा व्हिडिओ नवीन जिओ सिम घेत असलेल्या किंवा जिओ मध्ये पोर्ट करीत असलेल्या ग्राहकांसाठी आहे. व्हाउचर मिळवण्यासाठी रेफर करण्यात आलेल्या युजरला आपला नवीन जिओ सिम वर पहिला रिचार्ज १९९ रुपयाचा किंवा २४९ रुपयाचा करावा लागणार आहे. पुन्हा रेफरल कोड शेयर करावा लागणार आहे. एकदा सिम अॅक्टिवेट झाल्यानंतर त्यांना FRIEND असे लिहून 7977479774 वर व्हाट्सअॅप करावे लागणार आहे. ३ दिवसाच्या आत रेफरल मोबाइल नंबर सबमिट करावा लागणार आहे. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुमचा फोन नंबर वर व्हाउचर जोडला जातो. ज्यात MyJio अॅप द्वारे क्लेम केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DTrAqe
https://ift.tt/3BTp6r0
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.