Type Here to Get Search Results !

बजेट स्मार्टफोनमध्ये नवा पर्याय ! Itel ने लाँच केला पॉवरफुल Itel S17, फोनमध्ये मजबूत बॅटरी आणि ४ कॅमेरे

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने आपला बजेट स्मार्टफोन ग्राहकांसाठी दाखल केला आहे. या फोनच्या महत्त्वाच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत आणि फोनला अधिक पावरफुल करण्यासाठी यात ५००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह अनेक वैशिष्ट्ये आहेत. पाहा डिटेल्स. वाचा: Itel S17 : वैशिष्ट्ये सॉफ्टवेअर: फोन Android 11 Go Edition वर आधारित Intel Custom Skin वर काम करतो. डिस्प्ले: फोनमध्ये ६.६ इंच HD+ (७२०x१६१२ पिक्सेल) डिस्प्ले आहे जो ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, २.५ D कर्व्ड प्रोटेक्शनसह येतो. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजसह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी १.३ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढवणे शक्य आहे. कॅमेरा: फोनच्या मागील पॅनलवर तीन मागील कॅमेरे देण्यात आले आहेत, ८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सरही देण्यात आला आहे. बॅटरी: ५००० mAh बॅटरी या फोनमध्ये आहे. सुरक्षा: या Itel मोबाईल फोनला सुरक्षेसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट मिळेल. Itel S17 किंमत : या Itel मोबाईल फोनच्या १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत एनजीएन ४५,००० (अंदाजे ८,२०० रुपये) आहे. हा फोन स्काय ब्लू, मल्टीकलर ग्रीन आणि डीप-ओशन अशा तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iVa9xo
https://ift.tt/3mNPpse
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.