Type Here to Get Search Results !

१० तासांच्या बॅटरी लाईफसह Huawei FreeBuds 4i भारतात लाँच, मिळतोय मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: HUAWEI FreeBuds 4i earbuds भारतात लाँच करण्यात आले असून यात १० तासांची बॅटरी लाइफ यूजर्सना मिळेल. इअरबड्समध्ये म्युझिक प्लेबॅक आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये इअरबड्सना चार तासांचा प्लेबॅक वेळ मिळतो. हे डिव्हाइस डीप नॉइज कॅन्सलेशन फीचरसह येते. तसेच, यात युजर्सना इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव मिळेल. पाहा डिटेल्स. वाचा: किंमत आणि ऑफर HUAWEI FreeBuds 4i earbuds ७,९९० रुपयांच्या किमतीवर लाँच करण्यात आले आहेत. पण, ग्राहकांच्या दिवाळी ऑफरमध्ये, इयरबड्स १,००० रुपयांच्या त्वरित सवलतीत ६,९९० रुपयांना खरेदी करता येतील. तसेच, इअरबड्स Axis, Citi, CBCC आणि IndusInd बँक कार्ड्ससह विनाखर्च EMI आणि १० % त्वरित सवलतीसह खरेदी केले जाऊ शकतात. ही दिवाळी ऑफर २७ ऑक्टोबरपासून अॅमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे. हे इयरबड्स सिरॅमिक व्हाइट, कार्बन ब्लॅक, रेड आणि सिल्व्हर फ्रॉस्ट कलर पर्यायांमध्ये येतील. HUAWEI FreeBuds 4i चे फीचर्स: Huawei इयरबड्समध्ये डीप अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर देण्यात आले आहे. यात उत्तम बास आहे. HUAWEI FreeBuds 4i मध्ये अवेअरनेस मोड देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आजूबाजूचा स्पष्ट आवाज ऐकू शकतील. इयरबड्स प्रीमियम डिझाइन आणि अल्ट्रा-कन्फर्मसह येतील. त्याचे चार्जिंग केस आणि इअरबड्स गोलाकार डिझाइन आणि स्मूथ कडा येतात. HUAWEI FreeBuds 4i लाइटवेट फिटिंगसह येतो. HUAWEI FreeBuds 4i मध्ये १० mm डायनॅमिक ड्रायव्हर आहे. हे विस्तृत श्रेणीची उंची, रजिस्टर बेस आणि मागील चेंबर डिझाइनसह येते. HUAWEI FreeBuds 4i इअरबड्स PEEK+PU पॉलिमर डायाफ्राम पॅक करतात आणि व्यावसायिकरित्या ट्यून केलेले उच्च दर्जाचे पॉप संगीत देतात. HUAWEI FreeBuds 4i १० तासांचा संगीत प्लेबॅक, ६.५ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ देतात. Huawei नुसार, युजर्सना यात फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ४ तासांचा बॅकअप मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jDwCPF
https://ift.tt/3vM4mPC
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.