Type Here to Get Search Results !

१७ ऑक्टोबरपासून सुरू होतोय Flipkart Big Diwali Sale; मोबाइल, टीव्हीवर मिळणार ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्लीः दिवाळी निमित्त ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ने बिग दिवाळी सेल () ची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान मोबाइल, टॅबलेट, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वर काही खास ऑफर्स देण्याचा दावा केला आहे. आधी आलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा फायदा उठवण्यापासून चुकले असतील त्यांच्यासाठी ही खास संधी आहे. फ्लिपकार्टची बिग दिवाळी सेल इतक्या तारखेपर्यंत चालेल फ्लिपकार्टची बिग दिवाळी सेल १७ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. तसेच हा सेल २३ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी लवकर सुरू होणार आहे. हा सेल १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. या बँक कार्ड्सवर मिळे सूट आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड धारकांसोबत अॅक्सिस बँक युजर्संना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. प्रोडक्ट्सवर इतकी सूट ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या नवीन वेबपेजच्या माहितीनुसार, बिग दिवाळी सेल स्मार्टफोन आणि टॅबलेट वर ८० टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. सोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज वर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. टीव्ही आणि अप्लायन्सेजवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. फ्लिपकार्ट सेल दरम्यान काही डिल्स दिली जाणार आहेत. सेल दरम्यान सकाळी १२ वाजता, सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नवी डिल दिसेल. टाइम बॉम्ब डील कॅटेगरीत सायंकाळी ६ वाजेपासून ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला एक नवीन डील दिसेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aug3Rv
https://ift.tt/3mO1cqF
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.