Type Here to Get Search Results !

भारतात लाँच झाला Fenda T-70X पार्टी ब्लूटूथ स्पीकर, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ऑडिओ कंपनी ने फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने भारतात Fenda T-70X ला लाँच केले आहे. हा २.० फ्लोर स्टँडिंग स्पीकर आहे. खास चित्रपट-गाणी ऐकण्यासाठी या स्पीकरला तयार करण्यात आले आहे. या स्पीकरद्वारे संपूर्ण घरात ऑडिओचा आनंद घेता येईल. हा एकटाच स्पीकर तुमच्या साउंडबार, एफएम ट्यूनर आणि म्यूझिक प्लेअरचे काम करेल. वाचा: शानदार डिझाइनसह येता. केवळ आवाजाच्याबाबतीतच नाही तर याचा लूक देखील आकर्षक आहे. वूडन कॅबिनेटचा उपयोग करून स्पीकरला डिझाइन करण्यात आले आहे. याचे वजन २३.४ किलो असून, जमीन ठेवल्यानंतर याचे वायब्रेशन कमी होते व शानदार ऑडिओ आउटपूट मिळतो. चित्रपट पाहताना शानदार अनुभव मिळावा यासाठी यात दमदार ड्राइव्हर्स दिले आहे. T-70X सबवूफर स्वरुपात ८ इंच ड्रायव्हर दिले आहे आणि ट्विन ५.२ इंच फुल रेंज स्पीकर आणि दोन १ इंच स्लिक डोम ट्विटर दिले आहे. तसेच १६० वॉट एम्प्लीफायरद्वारे शानदार साउंड अनुभव मिळतो. स्पीकर जोरात आवाज असताना देखील क्लिअर साउंड प्रदान करतो. हा स्पीकर ऑल-राउंडर फीचर पॅक ऑडिओ सिस्टमसह लेटेस्ट टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० आणि ऑक्स इनपूट, MP३/WMA प्लेबॅकसाठी यूएसबी आणि कार्ड रीडर इनपूट, केराओके मोडसाठी माइक-इन, १००-स्टेशन मेमरीसह एफएम रेडिओसाठी PLL टेक्नोलॉजी, टीव्हीसाठी ऑप्टिकल आणि HDMI (ARC) इनपूट, एलईडी डिस्प्ले आणि आयआर रिमोट कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. हा स्पीकर बिल्ट-इन रिचार्जेबल १२वी ४.५Ah बॅटरी सपोर्टसह येतो. किंमत आणि उपलब्धता Fenda T-70X पार्टी ब्लूटूथ स्पीकरला Amazon India आणि अन्य प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करू शकता. १२ महिन्यांच्या वॉरंटीसह येणाऱ्या या स्पीकरची किंमत १६,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FDdcnk
https://ift.tt/3DtNVKv
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.