Type Here to Get Search Results !

१ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाले Boult चे दमदार इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : ने भारतात आपले लेटेस्ट ला लाँच केले आहे. या इयरबड्सची इंट्रोडक्ट्री किंमत फक्त ९९९ रुपये आहे. इयरबड्सला ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू रंगात सादर केले असून, यावर १ वर्षाची वॉरंटी दिली आहे. इयरबड्सला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. वाचाः Boult AirBass GearPods चे फीचर्स GearPods TWS इयरबड्स, AirBass सीरिजमध्ये Boult Audio चे लेटेस्ट प्रोडक्ट्स आहे. हे क्रिस्प ऑडिओ, डीप बास आणि ३२ तासांच्या बॅटरी लाइफसह येतात. याशिवाय एकदा चार्ज केल्यानंतर हे ८ तास चालतात. कंपनीचे म्हणणे आहे की, यात सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, केवळ १० मिनिटांच्य चार्जिंगमध्ये १०० मिनिटांची बॅटरी लाइप मिळेल. यात यूएसबी-सी कनेक्टिव्ही दिली आहे. TWS इयरबड्स डिस्टॉरशन-फ्री डीप बाससाठी मायक्रो-वूफर्सच्या सेटसह येतात. यात एक्स्ट्रा सेंसिटिव्ह इन-बिल्ट मायक्रोफोन दिले आहे, जे स्पष्ट आवाज देण्यास सक्षम आहेत. Boult Audio AirBass GearPods कानात पूर्णपणे व्यवस्थित फिट बसतात. यास एबीएस कॉन्टेंट आणि सॉफ्ट सिलिकॉन टिप्सचा वापर करून बनवले आहे. GearPods हे एक यूनिक शेपमध्ये येतात. या इयरबड्सचे वजन खूपच कमी असून, तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय दिवसभर याचा वापर करू शकता. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी डिव्हाइसला आयपीएक्स५ सर्टिफिकेशन दिले आहे. बड्समध्ये टच कंट्रोल सपोर्ट दिला असून, याद्वारे म्यूझिक ट्रॅक, वॉइस कॉल्स आणि वॉइस असिस्टेंट फीचर्सचा वापर करू शकता. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oovumb
https://ift.tt/3iqeOaq
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.