Type Here to Get Search Results !

जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, २१ जीबी डेटा आणि कॉलिंग फ्री

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आहेत. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत जिओकडे २ रिचार्ज प्लान आहेत. यात एक प्लान जिओ फोन साठी आहे. हा ७५ रुपयाचा प्लान आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील दुसरा रिचार्ज प्लान ९८ रुपयाचा आहे. जर तुम्हाला कमी किंमतीतील प्लान हवा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी चांगला आहे. जाणून घ्या जिओच्या ९८ रुपयाच्या रिचार्ज प्लान मध्ये युजर्संना काय काय फायदे मिळत आहेत. ९८ रुपयाच्या प्लानमध्ये २१ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग रिलायन्स जिओचा ९८ रुपयाचा प्लान काही महिन्यापूर्वीच आला आहे. जिओच्या या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही. ७५ रुपयाचा प्लान, २८ दिवसाची वैधता आणि ३ जीबी डेटा रिलायन्स जिओचा जिओ फोन युजर्संसाठी हा प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग मिळते. प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा हाय स्पीड डेटा युजर्संना दिला जातो. ७५ रुपयाच्या या प्लानमध्ये ५० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BEX8iE
https://ift.tt/3DB9DfR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.