Type Here to Get Search Results !

मोबाइल डेटा लवकर समाप्त होतो? काळजी करण्याचे कारण नाही, या टिप्स वापरून करा बचत

नवी दिल्ली : सध्या ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाइन क्लासेस, व्हिडिओ पाहणे अशा अनेक गोष्टींसाठी मोबाइलचा वापर होतो. यामुळे डेटा देखील लवकर समाप्त होतो. तुमचा डेटा देखील लवकर समाप्त होत असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या डेटाची बचत होईल. वाचा: Auto-update अ‍ॅप्स पर्याय करा बंद
  • वाचवण्यासाठी ऑटो-अपडेट पर्याय बंद करा. हा पर्याय बंद करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
  • गुगल प्ले स्टोरवर जा.
  • येथे ऑटो-अपडेट पर्याय दिसेल.
  • आता हा पर्याय बंद करा.
  • यामुळे कोणतेही अ‍ॅप आपोआप अपडेट होणार नाही.
Data Saver फीचरचा करा वापर अँड्राइड फोनमध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी डेटा सेव्हर नावाचे फीचर आहे. या फीचरचा वापर करून तुम्ही डेटा वाचवू शकता. हे फीचर एनेबल केल्यानतंर सर्व अ‍ॅप्सला डेटा वापरण्यापासून रोखते. डेटा सेव्हर फीचरला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क अँड इंटरनेटवर क्लिक करा. येथे तुम्हाला डेटा सेव्हर हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही याचा वापर करू शकता. व्हिडिओ पाहताना वाचवा डेटा युट्यूबवर व्हिडिओ पाहताना देखील डेटाचा अधिक वापर होतो. युट्यूब अ‍ॅपवरील एका फीचरद्वारे तुम्ही डेटा वाचवू शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
  • YouTube अ‍ॅप ओपन करून, सेटिंगमध्ये जा.
  • आता जनरलवर टॅप करून, लिमिट मोबाइल डेटा यूसेज ऑन करा.
  • यामुळे व्हिडिओ एचडी फॉर्मेटमध्ये प्ले होणार नाही व डेटा वाचेल.
Auto Play पर्याय करा बंद फेसबुक वापरताना त्यावरील व्हिडिओ आपोआप प्ले होतात व यामुळे अधिक डेटा खर्च होतो. तुम्ही फेसबुक अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले पर्याय बंद करू शकता. यामुळे डेटा बचत होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Xqz5Fs
https://ift.tt/3pbUJIV
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.