Type Here to Get Search Results !

महागाईत जिओची खास ऑफर! ‘या’ रिचार्ज प्लॅन्सवर देत आहे २०% कॅशबॅक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने यूजर्ससाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि वर ही ऑफर लिस्ट करण्यात आली आहे. अंतर्गत कंपनी ग्राहकांना रिचार्जवर २० टक्के कॅशबॅक देत आहे. वाढत्या महागाईच्या काळात २० टक्के कॅशबॅकमुळे तुमचा नक्कीच फायदा होईल. ही ऑफर कोणत्या वर आहे, त्याबाबत जाणून घेऊया. वाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लॅन या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळते. म्हणजे एकूण ५६ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. जिओचा ५५५ रुपयांचा प्लॅन जिओच्या या ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, एकूण १२८ जीबी डेटा मिळतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जिओचा ५९९ रुपयांचा प्लॅन ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. वरील तिन्ही प्लॅन्समध्ये कंपनी २० टक्के कॅशबॅक देत आहे. म्हणजेच, कोणत्याही यूजर्सला हे रिचार्ज केल्यावर २० टक्के कॅशबॅक मिळेल. दरम्यान, ऑफरचा फायदा केवळ प्रीपेड यूजर्सलाच मिळेल. सध्या ही ऑफर जिओ पोस्टपेड यूजर्ससाठी उपलब्ध नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3phIRFv
https://ift.tt/3lPrrh0
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.