नवी दिल्लीः चे अपडेट गुगल पिक्सल फोन्ससाठी रोलआउट करणे सुरू करण्यात आले आहे. युजर्संना याच्या अपडेट केल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी युजर्सं या अपडेटवरून खूप उत्सूक दिसत होते. परंतु, आता हे अपडेट युजर्संना चांगलेच महागात पडले आहे. युजर्संना या ठिकाणी टच स्क्रीन अॅक्सेस करण्यास अडचण येत आहे. तर अॅप क्रॅश सुद्धा मोठी समस्या येत आहे. गुगलने नुकतेच अँड्रॉयड १२ अपडेट जारी केले आहे. परंतु, ज्या पद्धतीने याचे परिणाम दिसायला पाहिजे होते. तसेच आजिबात दिसत नाहीत. नवीन अपडेटला खूप टेस्टिंग केल्यानंतर रोल आउट करण्यात आले होते. युजर्संना या अपडेट सोबत स्मार्टफोन चालवण्यात अडचण येत आहेत. स्मार्टफोन चालवण्यात येत आहे अडचण अनेक युजर्स अडचण येत असल्याची तक्रार करीत आहेत. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड १२ अपडेटला इंस्टॉल केल्यानंतर टच स्क्रीनला अॅक्सेस केल्यनंतर अडचण येत आहे. अनेकदा टच पूर्णपणे काम करणे बंद करीत आहे. आवश्यक काम करताना खूप अडचण येत आहे. काही युजर्संचे अॅप क्रॅश होत आहेत. याची तक्रार रिपोर्ट युजर्सं गुगल फोरमवर करीत आहे. अन्य एका तक्रारीत युजर्संकडून या अपडेटमुळे बॅटरी लवकर संपत आहे, अशीही तक्रार करण्यात आली आहे. काही युजर्संनी जेव्हापासून या नवीन अपडेटला इंस्टॉल केले आहे. तेव्हापासून त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त चालत नसल्याचे म्हटले आहे. एकूण काय तर नवीन अपडेट मुळे फायदा होण्याऐवजी जास्त नुकसान झाल्याचा संताप युजर्सं व्यक्त करीत आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mcXmbK
https://ift.tt/3EcL8WB

