Type Here to Get Search Results !

येतेय Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सीरिज, ‘या’ तारखेला होणार एंट्री

नवी दिल्ली : ची नवीन सीरिज Civi ची घोषणा झाली आहे. सीरिजला २७ सप्टेंबरला चीनमध्ये लाँच केले जाईल. या नवीन सीरिज अंतर्गत कंपनीने तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. फोनमध्ये स्लिम बिल्ड आमि दमदार कॅमेरा सेटअप दिला जाईल. शाओमीकडून सिव्ही मॉडेल्सच्या फीचर्सबाबत माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार, कंपनी अनेक मॉडेल्समध्ये या सीरिजला सादर करू शकते. फोनला भारतात लाँच केले जाईल की नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही. वाचा: चीनमधील सोशल मीडिया Weibo वरील पोस्टनुसार, कंपनीने Xiaomi Civi स्मार्टफोन सीरिजच्या लाँचिंग तारखेचा खुलासा केला आहे. हा फोन २७ सप्टेंबरला दुपारी ११.३० वाजता लाँच होईल. कंपनीने Weibo वर नवीन स्मार्टफोनच्या कॅमेरा परफॉर्मेंसबाबत टीज केले आहे. चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात TENAA वेबसाइटवर मॉडेल नंबर २१०७११८DC ने फोनला स्पॉट करण्यात आले होते. Xiaomi Civi सीरिजमधील स्मार्टफोन Xiaomi 11 Lite 5G NE प्रमाणेच असतील. या फोनला भारतात २९ सप्टेंबरला लाँच केले जाणार आहे. गेल्या आठवड्यात या फोनला जागतिक बाजारात लाँच करण्यात आले होते. Xiaomi 11 Lite 5G NE चे स्पेसिफिकेशन्स Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोनला ९० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले सपोर्टसह सादर केले जाऊ शकते. फोनमध्य ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा फोन Qualcomm Snapdragon ७७८G SoC चिपसेट आणि ६/८जीबी रॅम सपोर्ट मिळेल. पॉवरसाठी यात ४,२५०एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u2qu7L
https://ift.tt/39sV6G7
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.