Type Here to Get Search Results !

युजर्संना झटका! Reliance Jio ने बंद केले आपले २ स्वस्त रिचार्ज प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () सह दुसऱ्या टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लान्स मध्ये लागोपाठ बदल करीत आहेत. जिओ ने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये मोठे बदल केले आहेत. जिओने आपल्या २ स्वस्त रिचार्ज प्लानला बंद केले आहे. जिओचे हे रिचार्ज प्लान ३९ रुपये आणि ६९ रुपयाचे आहेत. हे दोन्ही रिचार्ज जिओ फोनचे आहेत. ३९ रुपये आणि ६९ रुपयाचे रिचार्ज प्लान आता जिओच्या वेबसाइटवर दिसत नाहीत. याआधी जिओ फोनचे अनेक रिचार्ज प्लान्स कंपनी बाय १ गेट वन फ्री ऑफर देत होती त्याला आता बंद केले आहे. ३९ रुपयाच्या प्लानमध्ये १४ दिवसाची वैधता जिओ फोनचा ३९ रुपयाचा रिचार्ज प्लान सर्वात स्वस्त प्लान होता. या प्लानमध्ये युजर्संना १४ दिवसाची वैधता मिळत होती. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळत होता. जिओ फोनच्या या प्लानमध्ये रोज १०० एमबी डेटा युजर्संना दिला जात होता. म्हणजेच प्लानमध्ये एकूण १.४ जीबी डेटा मिळत होता. युजर्संना जिओ अॅप्स (JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, JioCloud) चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत होते. ६९ रुपयाच्या प्लानमध्ये १४ दिवसाची वैधता, ७५ जीबी डेटा ६९ रुपयाच्या प्लान सुद्धा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान होता. हा प्लान सुद्धा आता जिओच्या वेबसाइटवर दिसत नाही. जिओच्या ६९ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना १४ दिवसाची वैधता मिळत होती. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळत होता. जिओच्या या प्लानमध्ये रोज ०.५ जीबी डेटा दिला जात होता. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा मिळत होता. याशिवाय, युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yQ3Os1
https://ift.tt/3tqeMmR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.