नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत झाल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. एका ठिकाणी तर, फोनला आग लागल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग देखील करावे लागले. होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा अनेक प्रकरणांमध्ये कंपनी ग्राहकांनाच दोष देते. पण, ब्लास्टचे असे भयानक फोटो आणि व्हिडिओ सतत समोर येत असल्यामुळे लोकांच्या मनात याविषयी भीती निर्माण झाली आहे. कारण, हे कधीही आणि कुणा सोबतही होऊ शकते. अलीकडे हिमाचल प्रदेश मधून असेच फोनमध्ये ब्लास्ट झाल्यानंतरचे भीतीदायक फोटो समोर आले आहेत. पीडित व्यक्तीने ट्विटरवर स्फोट झालेल्या फोनचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अगदी कुणालाही भीती वाटेल. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण. वाचा: खरं म्हणजे, ट्विटर युजर @Ammybhardwaj13 ने आज आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट टाकली आहे. ज्यात त्याने म्हटले की, आपला स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. ट्विटमध्ये त्याने सांगितले की, हा फोन केवळ २ महिन्यापूर्वी खरेदी केला होता. आज चार्जिंग दरम्यान त्यात स्फोट झाला आहे. ट्विटमध्ये त्याने कंपनीला विचारले की, माझा फोन रिप्लेस करणार की नाही. अन्यथा कंपनीविरोधात तक्रार करेन. ट्विट सोबत शेयर करण्यात आलेल्या फोटोवरून हे स्पष्ट दिसते की, फोन कसा जळाला आहे. एका मीडिया संस्थेसी बोलताना पीडित व्यक्तीने सांगितले की, मी हिमाचल प्रदेशात राहतो. तसेच फोनला मी जवाली, कांगडा येथील धीमन इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स अँड मोबाइलवरून दोन महिन्यापूर्वी Poco X3 Pro स्मार्टफोनला खरेदी केले होते. मी फोनला चार्जिंगला लावले होते. फोन ज्यावेळी १०० टक्के चार्ज झाला तर मी तो काढला. अंथरुनावर टाकून वॉशरूमला गेलो. ५ ते ७ मिनिटा नंतर मला दिसले की, फोनला आग लागली होती. माझ्या बेडवरील चादर जळाले होते. मी तात्काळ त्याला खाली फेकले व आग विझवण्यासाठी पाणी टाकले. पीडित व्यक्तीने सांगितले की, मी फोन सर्विस सेंटरमध्ये जमा केला. त्यानंतर मला तक्रार नंबर मिळाला. सर्विस सेंटरने मला अजून काहीही आश्वासन दिले नाही. फोन रिप्लेस करून नवीन मिळेल की नाही. माझ्याकडून सर्व डिटेल्स मागितली गेली होती ती मी तात्काळ दिली आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BVSyfV
https://ift.tt/3jJjV6r

