Type Here to Get Search Results !

Jio च्या या ३ रिचार्ज प्लानवर २० टक्के कॅशबॅक, १६८ जीबीपर्यंत डेटा आणि सोबत फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा फायदा घेवून आली आहे. जिओने गेल्या काही दिवसांपूर्वी आपले ३ रिचार्ज प्लान्सवर २० टक्के कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओचा हा प्लान २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयाचे आहेत. जिओने आपल्या वेबसाइटमध्ये या तिन्ही प्लान्सला वेगळे कॅशबॅक देण्याच्या कॅटेगरीत ठेवले आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये १६८ जीबी पर्यंत डेटा मिळतो. जाणून घ्या डिटेल्स. ५९९ रुपयाचा प्लान ८४ दिवसाची वैधता आणि १६८ जीबी डेटा रिलायन्स जिओचा ५९९ रुपयाचा प्लानवर २० टक्के कॅशबॅक आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. ५५५ रुपयाचा प्लान ८४ दिवसाची वैधता आणि १२६ जीबी डेटा रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये २० टक्के कॅशबॅकचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. २४९ रुपयाचा प्लान २८ दिवसाची वैधता आणि ५६ जीबी डेटा रिलायन्स जिओचा कॅशबॅकच्या रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ५६ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत प्लानमध्ये रोज १०० एसएमएस शिवाय जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W6RUNi
https://ift.tt/2XwIQBz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.