Type Here to Get Search Results !

iPhone 13 पासून Mi 11T पर्यंत, या आठवड्यात येताहेत हे स्मार्टफोन्स, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा स्मार्टफोन प्रेमींसाठी खास असणार आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे अॅपल सप्टेंबर मध्ये आपला आयफोनची नवीन सीरीज घेऊन येत आहे. अॅपल १४ सप्टेंबर रोजी आयफोन १३ सह अन्य मॉडल लाँच करणार आहे. याशिवाय, शाओमी आपला पॉवरफुल डिव्हाइस घेऊन येत आहे. तसेच गुगल सुद्धा नवीन पिक्सल फोन याच आठवड्यात लाँच करणार आहे. जाणून घ्या या आठवड्यात येणाऱ्या स्मार्टफोन्सविषयी. Apple सीरीज कंपनी १४ सप्टेंबर रोजी इव्हेंट आयोजित करीत आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी या सीरीज अंतर्गत चार मॉडल्स iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max आणले जावू शकतात. प्रो मॅक्स या चारही मध्ये सर्वात मोठ्या डिस्प्ले सोबत येईल. आयफोन १२ मॅक्सच्या तुलनेत यात कॅमेरा, परफॉर्मन्स आणि बॅटरीला अपग्रेड केले जावू शकते. आयफोन १३ मिनीची डिझाइन, बॅटरी, परफॉर्मन्स सोबत कॅमेरा सिस्टम सोबत अपग्रेडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. Xiaomi Mi 11T चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी १५ सप्टेंबर रोजी एक ग्लोबल इव्हेंट आयोजित करीत आहे. याला ऑनलाइन लाँच इव्हेंट दरम्यान कंपनी Mi 11T, Mi 11T Pro आणि Mi 11 Lite NE सह काही नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. या सीरीजच्या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 5,000 mAh ची बॅटरी सोबत १२० वॉट फास्ट चार्जिंग दिली जावू शकते. याला भारतीय बजारात कधीपर्यंत लाँच केले जाणार यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. Google Pixel 6 series गुगलने आपली अपकमिंग पिक्सेल ६ आणि पिक्सेल ६ प्रो डिव्हाइस लाँच करण्याची तारीख अजून अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. दरम्यान, रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल १५ सप्टेंबरला नवीन पिक्सेल फोन आणणार आहे. कंपनीने आधीच सांगितले आहे की, दोन्ही डिव्हाइस मध्ये गुगलचा स्वतःचा चिपसेट Tensor चा वापर केला जाणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये ड्युअल टोन डिझाइन सोबत मल्टिपल कॅमेरा सेन्सर दिला जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A7P49s
https://ift.tt/394xyqA
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.