Type Here to Get Search Results !

एकच नंबर! Facebook ने व्हीडिओ कॉलिंगसाठी लाँच केले 'हे' भन्नाट डिव्हाइस, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ने दोन पोर्टेबल व्हीडिओ कॉलिंग डिव्हाइस आणि ला लाँच केले आहे. Portable Go या लाइनअपमधील पहिले डिव्हाइस आहे. फेसबुकने म्हटले आहे की, बिझनेस सर्व्हिसच्या रिमोट वर्किंगसाठी पोर्टेबल डिव्हाइसचे टेस्टिंग केले जात आहे. ची किंमत १९९ डॉलर्स (जवळपास १४,६०० रुपये) आहे. तर मोठ्या स्क्रीनच्या Portable Plus ची किंमत ३४९ डॉलर्स (जवळपास २७,५०० रुपये) आहे. दोन्ही डिव्हाइस १९ ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. वाचा: स्पेसिफिकेशन्स Portable Go मध्ये व्हीडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबतच, एक अल्ट्रा वाइड फील्ड ऑफ व्ह्यू (FoV) कॅमेरा दिला आहे. या पोर्टेबल डिव्हाइसला हाताळणे सोपे आहे. यासाठी यात एक हँडल दिले आहे. सोबतच, यात जास्त क्षमतेची बॅटरी दिली आहे, ज्यामुळे विना चार्जिंग जास्त वेळ व्हीडिओ कॉलिंग करता येईल. डिव्हाइसध्ये शानदार स्पीकर्स देखील दिले आहेत. Portable Plus Portable Plus मध्ये एक १४ इंच डिस्प्ले दिला आहे. यात १२ मेगापिक्सल स्मार्ट कॅमेरा सेटअप दिला आहे. सोबतच, एक अल्ट्रा वाइड फील्ड ऑफ व्ह्यू कॅमेरा आहे. यात स्टीरियो स्पीकर दिले आहे. यात हाउस मोड फीचरचा सपोर्ट मिळेल. याच्या मदतीने पोर्टल शेअर करता येईल. यावर टीव्ही देखील पाहता येईल. पोर्टलमध्ये चा सपोर्ट दिला जाईल, असेही फेसबुकने म्हटले आहे. वर्क फ्रॉम होमसाठी उपयोगी येईल डिव्हाइस Facebook कडून पोर्टल्सच्या सेल्स नंबरची माहिती दिलेली नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्यांनुसार, करोना संकटाच्या काळात अनेक कंपन्या रिमोटली काम करत आहे. अशात पोर्टेबल डिव्हाइसची विक्री वाढू शकते. दरम्यान, फेसबुकने गेल्या महिन्यात VR Remote Work अ‍ॅप सादर केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Za8ehd
https://ift.tt/3u2fFT3
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.