Type Here to Get Search Results !

Boult ने आणले दमदार साउंडचे नवीन TWS इयरबड्स, २० तासांची बॅटरी लाइफ

नवी दिल्लीः ने भारतात आपले नवीन TWS इयरबड्स लाँच केले आहे. हे इयरबड्स ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. शानदार ऑडियो क्वॉलिटीच्या या बड्सची किंमत ९९९ रुपये आहे. कंपनीच्या या लेटेस्ट बड्सला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकते. बड्सला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कंपनीच्या लेटेस्ट TWS इयरबड्स मध्ये दमदार साउंडसाठी 13mm चे ड्रायव्हर दिले आहेत. बड्सची डिझाइन खूपच जबरदस्त आहे. तसेच सहज फिट होते. ब्लूटूथ ५.१ कनेक्टिविटीला सपोर्ट करणाऱ्या बड्स मध्ये IPX5 रेटिंग दिली आहे. गुगल असिस्टेंट सपोर्ट असलेल्या या बड्सची बॅटरी लाइफ ५ तास पर्यंत आहे. चार्जिंग केस सोबत ही बॅटरी लाइफ वाढून २० तासांपर्यंत जाते. हे बड्स यूएसबी टाइप सी चार्जिंग सपोर्ट करते. कॉल एक्सपीरियन्ससाठी यात कंपनी अल्ट्रा सेन्सिटिव्ह मायक्रोफोन्स ऑफर करीत आहे. ग्लॉसी एक्सटीरियर आणि ड्युअल टोन फिनिशच्या या बड्स मध्ये टच कंट्रोल फीचर दिले आहेत. याच्या मदतीने कॉल करण्यासोबतच म्युझिक ट्रॅक सुद्धा चेंज करू शकता. बड्सची वायरलेस रेंज १० मीटर पर्यंत आहे. बड्सचे वजन १०० ग्रॅम आहे. १ वर्षापर्यंत वॉरंटी येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ei4tXa
https://ift.tt/3nAHqRE
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.