Type Here to Get Search Results !

येतोय फ्लिपकार्टचा ‘खास’ सेल; ७ नवीन लाँचसह ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

नवी दिल्ली : भारतात ७ ऑक्टोबरपासून Big Billion Days सेलला सुरूवात होत आहे. हा १२ ऑक्टोबरपर्यंत चालेल. नेहमीप्रमाणेच मेंबर्सला या सेलचा लवकर अ‍ॅक्सेस मिळेल. सेलमध्ये ग्राहकांना आयसीआयसीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अ‍ॅक्सिस बँक कार्डवर १० टक्के सूट मिळेल. तसेच, ग्राहकांना पेटीएम कॅशबॅक ऑफरचा देखील लाभ घेता येणार आहे. वाचा: सेलच्याआधी फ्लिपकार्टने काही नवीन प्रोडक्ट्स लाँचचा खुलासा केला आहे. यामध्ये मायक्रोमॅक्स, इनफिनिक्स, ओप्पो, विवोसह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. २८ सप्टेंबरला रियलमी व पोकोचा नवीन फोन आणि ३० सप्टेंबरला विवोचा फोन लाँच होईल. १ ऑक्टोबरला मोटोरोला आपला नवीन फोन लाँच करणार आहे. यासह फ्लिपकार्टवर अनेक डिव्हाइस उपलब्ध होतील. फ्लिपकार्टने काही प्रोडक्ट्स ऑफर्सची माहिती दिली आहे. सेलमध्ये Asus ROG Phone 3 ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. तरेसच, २२,९९९ रुपये किंमतीचा मोटोरोला एड्ज २० फ्यूजन स्मार्टफोन सेलमध्ये १९,९९९ रुपयात मिळेल. सेलमध्ये १६,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याची मूळ किंमत १८,९९९ रुपये आहे. सेलमध्ये १७,९९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. Moto G40 Fusion ची किंमत १४,४९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टने स्मार्टफोनवरील सर्व डील्सचा अद्याप खुलासा केलेला नाही. ऑनलाइन रिटेलर Pixel 4a आणि iPhone मॉडेलवर देखील सूट देत आहे. फ्लिपकार्टने एक्सचेंज ऑफरची देखील घोषणा केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना जुन्या फोनवर २ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. याशिवाय २९९ रुपयांपासून सुरू होणारे मोबाइल प्रोटेक्शन प्लान देखील उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AzMbi2
https://ift.tt/2VZCwC7
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.