Type Here to Get Search Results !

‘हा’ भन्नाट स्मार्टफोन फक्त ६९९ रुपयात खरेदीची संधी, कमी किंमतीत मिळतात शानदार फीचर्स

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच आपला नवीन Infinix Hot 11S ला भारतीय बाजारात लाँच केले होते. या फोनला बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते. कमी किंमतीतील फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. आजपासून फ्लिपकार्टवर चा सेल सुरू होत आहे. सेलमध्ये काही खास ऑफर्स देखील मिळतील. या फोन्सची किंमत आणि फीचर्स पाहुयात. वाचा: Infinix Hot 11S ची किंमत आणि ऑफर्स: या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. हा फोन केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. फोनवर १०,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्हाला जुन्या फोनवर एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ६९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच, दरमहिना ३८२ रुपये देऊन ईएमआयवर देखील फोन खरेदी करता येईल. एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के सूट, Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकसह अन्य कार्ड ऑफर्स मिळत आहे. Infinix Hot 11S चे फीचर्स: फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G८८ प्रोसेसरसोबत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर ५० मेगापिक्सल आहे. दुसरा २ मेगापिक्सल आणि तिसरा एआय लेंस आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EEbq5d
https://ift.tt/39mvcUf
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.