Type Here to Get Search Results !

१५२ रुपयात रोज २ जीबी डेटा, महिनाभर चालणार जिओचा हा प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या प्लान्सला अनेक कॅटेगरीत विभागले आहे. त्यामुळे ग्राहकांना प्लानला निवडणे कठीण होते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओच्या एका स्वस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची किंमत १५२ रुपये आहे. हा महिनाभर चालणारा प्लान आहे. जाणून घ्या डिटेल्स. Jio चा १५२ रुपयाचा प्लान हा रिलायन्स जिओचा JioPhone Data Add On प्लान आहे. म्हणजेच या प्लानचा वापर जिओ फोन ग्राहक अतिरिक्त डेटा साठी करू शकतात. १५२ रुपयाच्या या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता दिली जाते. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे एकूण डेटा ५६ जीबी दिला जातो. प्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जात नाही. हा प्लान अशा स्थितीत ठीक आहे. ज्यावेळी तुमच्याकडे पर्याप्त डेटा नाही. JioPhone चे अन्य डेटा प्लान १५२ रुपयाच्या प्रमाणे कंपनी आणखी अनेक जिओ फोन डेटा ऑफर करते. या प्लानची किंमत २२ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, ५२ रुपये, ७२ रुपये, आणि १०२ रुपयाचे JioPhone Data Add On प्लान मिळते. या सर्व प्लान्समध्ये ग्राहकांना २८ दिवसाची वैधता मिळते. २२ रुपयाच्या डेटा अॅड ऑन प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा आणि ५२ रुपयाचा डेटा अॅड ऑन प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. ७२ रुपयाचा जिओ फोन डेटा प्लान मध्ये रोज ०.५ जीबी डेटा सोबत येतो. यात एकूण १४ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे १०२ रुपयांचा जिओ फोन डेटा प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. यात एकूण २८ जीबी डेटा मिळतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zSkccT
https://ift.tt/3yOu6er
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.