Type Here to Get Search Results !

Vi चे शानदार प्लान्स, अनलिमिटेड डेटा-कॉलिंगसह मिळेल Netflix, Amazon Prime चे सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी () ने काही दिवसांपूर्वी दोन नवीन प्लान्स सादर केले होते. हे प्लान्स अनलिमिटेड डेटा आणि , Video सारख्या ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतात. याशिवाय यात अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळेल. वाचा: Vi (Vodafone Idea) ने १,६९९ आणि २,२९९ रुपयांचे दोन नवीन पोस्टपेट प्लान्स लाँच केले आहे. हे दोन्ही RedX Family प्लान्स मल्टी कनेक्शन सपोर्टसह येतात व यात अनलिमिटेड बेनिफिट्स दिले जात आहे. या दोन्ही पोस्टपेड प्लान्सबद्दल डिटेल्समध्ये जाणून घेऊया. Vi चा १,६९९ रुपयांचा RedX Family प्लान या प्लानची वैधता एक महिना आहे. म्हणजेच, याच सबसक्रिप्शन एक महिन्यांसाठीच असते. प्लानचा वापर तीन जण करू शकतात. या पोस्टपेड प्लानसोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल कॉल्स मोफत आहेत. सोबतच, अनलिमिटेड डेटा आणि ३ हजार एसएमएसची देखील सुविधा मिळते. याशिवाय या प्लानमध्ये एक वर्षासाठी Amazon Prime चे सबस्क्रिप्शन मिळत आहे. एक वर्षासाठी आणि डिज्नी+ हॉटस्टार VIP सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. याशिवाय कंपनी Vi Movies and TV VIP, इंटरनॅशन आणि डोमेस्टिक एअरपोर्ट लाउन्ज (एका वर्षात चार वेळा) देखील ऑफर केले जात आहे. तसेच, ग्राहकांना ७ दिवस मोफत इंटरनॅशनल रोमिंग पॅक देण्यात आला आहे. दरम्यान, प्रायमरी कनेक्शनला सर्व अ‍ॅक्सेस मिळतील. मात्र, इतर कनेक्शन्सला केवळ अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉल आणि ३ हजार एसएमएस मिळेल. Vi च्या २,२९९ रुपयांच्या RedX Family प्लानमध्ये देखील वर दिलेले सर्व बेनिफिट्स मिळतील. मात्र, यात ५ मेंबर्स कनेक्शन देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ym2I7m
https://ift.tt/3zhxU8Y
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.