Type Here to Get Search Results !

अखेर भारतात लाँच झाला Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : सॅमसंगने आपला नवीन Galaxy Z Fold 3 5G ला भारतात लाँच केले आहे. हा फोन आकर्षक डिझाइनसह येतो. ज्यांना इतरांपेक्षा वेगळा स्मार्टफोन हवा असेल ते हा फोन नक्कीच खरेदी करू शकतात. वाचा: फोन फँटम ब्लॅक, फँटम ग्रीन आणि फँटम सिल्वर रंगात येतो. यामध्ये रिफाइन फिनिशिंग देण्यात आली आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनवर पहिल्यांदाच एस पेनद्वारे लिहू शकता आणि स्केच बनवता येईल. फोन आयपीएक्स८ वॉटर रेसिस्टेंट आहे. ची वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ७.६ इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. मेन आणि कव्हर स्क्रीन दोन्हीवर सुपर स्मूथ १२० हर्ट्ज अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह स्मूथ स्क्रॉलिंग आणि क्विक डिव्हाइस इंटरॅक्शन अनुभव मिळेल. यूजर्सला मेन स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंग दरम्यान नोट्स लिहिणे, ईमेल वाचणे, टू-डू लिस्ट चेक करता येईल. यूजर पेनसह क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतात. फोनसोबत एस पेन फोल्ड एडिशन आणि एस पेन प्रो अशा दोन पर्यायांसोबत येतो. पेनला वेगळे खरेदी करावे लागेल. फोनमधील मल्टी- अ‍ॅक्टिव्ह विंडोसह डिव्हाइसच्या मोठ्या स्क्रीनवर कॅलेंडर तपासू शकता व टेक्स्ट देखील करता येईल. झेड फोल्ड ३ वर यूजर अ‍ॅप्स उघडण्यासाठी एक शॉर्टकट देखील बनवू शकतात. गॅलेक्सी झेड फोल्ड ३ ५जी च्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,४९,९९९ रुपये (फँटम ब्लॅक आणि फँटम ग्रीन कलर) आहे. तर १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत १,५७,९९९ रुपये (फँटम ब्लॅक आणि फँटम ग्रीन कलर) आहे. भारतीय ग्राहक या स्मार्टफोनला २४ ऑगस्टपासून प्री-बुक करू शकतात. याशिवाय फोनवर काही खास ऑफर्स देखील मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DbtyT2
https://ift.tt/3j7pbQU
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.