Type Here to Get Search Results !

आज भारतात लाँच होणार Samsung Galaxy M32 5G, मिळतील धमाकेदार फीचर्स

नवी दिल्ली : आज भारतात Galaxy M32 5G या स्मार्टफोनला लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, या फोनची किंमत जवळपास २५ हजार रुपये असू शकते. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: आज लाँच होणार : आज दुपारी १२ वाजता लाँच होईल. फोन खरेदीसाठी Amazon वर उपलब्ध होईल. या फोनची किंमत २० ते २५ हजार रुपये असू शकते. या फोनला Amazon, Samsung.com आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून २ सप्टेंबरपासून खरेदी करू शकता. Samsung Galaxy M32 5G चे फीचर्स: या फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील मिळेल. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल असेल. फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसरसह येईल. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. यात १२ ५जी बँडचा सपोर्ट मिळेल. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ टीएफटी इन्फिनिटी व्ही डिस्प्ले मिळेल, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यावर कॉर्निंग गोरिल्ल ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोन ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येईल. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोनचा दुसरा सेंसर ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, तिसरा ५ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि चौथा २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर असेल. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D8rKKy
https://ift.tt/3kn7dJF
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.