Type Here to Get Search Results !

Reliance Jio चे सर्वात जबरदस्त प्लान, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा बंपर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कडे प्रीपेड प्लान्सची एक मोठी लिस्ट आहे. त्यामुळे युजर्संना अनेकदा कोणता प्लानची निवड करावी यावरून गोंधळ उडतो. जर तुम्हाला सुद्धा जास्त पैसे खर्च न करता चांगल्या प्लानच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमची ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा एका प्लान संबंधी माहिती देणार आहोत, ज्याची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. यात मोठी वैधता मिळते. जाणून घ्या या प्लान संबंधी. वाचाः Reliance Jio चा ९८ रुपयांचा प्लान सर्वात आधी जिओच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान संबंधी माहिती घेवू. या प्लानची किंमत ९८ रुपये आहे. हे रिचार्ज पॅक १४ दिवसांच्या वैधतेसोबत येते. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे युजर्संना २१ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संलप्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री ऑफर मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा १२९ रुपयांचा पॅक जिओचा हा प्लान १०० रुपयांपेक्षा थोडा महाग आहे. परंतु, यासोबत मिळणारे बेनिफिट्स जास्त आहेत. जिओच्या या प्लानची किंमत १२९ रुपये आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा ऑफर केला जातो. ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत ३०० एसएमएस दिले जाते. जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड, जिओ सिक्योरिटी आणि जिओ न्यूज सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा प्लान १५० रुपयांपेक्षा कमी किमतीतील बेस्ट प्लान आहे. १४९ रुपयांच्या पॅक मध्ये २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps राहते. ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. जिओचा हा रिचार्ज पॅक जिओ अॅप्सच्या फ्री सब्सक्रिप्शन सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37H339w
https://ift.tt/3fZFD3T
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.