Type Here to Get Search Results !

Oppo ने गुपचूपपणे लाँच केला धमाकेदार स्मार्टफोन, कमी किंमतीत जबरदस्त बॅटरी आणि कॅमेरा

नवी दिल्लीः Oppo ने गुपचूप पणे आपला नवीन स्मार्टफोन ला नेदरलँडमध्ये लाँच केले आहे. Oppo A16 च्या यशानंतर कंपनीने या फोनचे अपग्रेड व्हर्जन लाँच केले आहे. हे NFC सपोर्ट सोबत येते. डिव्हाइस मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरी आणि ड्युअल 4G LTE सपोर्ट मिळतो. Oppo A16s ला सिंगल व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज सोबत लाँच केले आहे. याची किंमत १४९ यूरो म्हणजेच जवळपास १३ हजार रुपये आहे. जाणून घ्या या फोनविषयी. वाचा: Oppo A16s चे फीचर्स हे क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लू कलर व्हेरियंटमध्ये येतो. स्मार्टफोनला ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. Oppo A16s मध्ये A16 प्रमाणेच फीचर्स दिले आहेत. परंतु, NFC सपोर्ट जोडले आहे. फोनमध्ये एचडी प्लस (720 X 1600 पिक्सल) रेजोल्यूशन दिले आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा ड्यू ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. यात 60Hz रिफ्रेश रेटचा IPS LCD पॅनेल दिले आहे. वाचा: Oppo A16s चा कॅमेरा यात सेल्फी शॉट्ससाठी फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा आणि मागच्या बाजुला ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिले आहे. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ युनिट दिले आहे. रियर कॅमेरा 30fps वर 1080 व्हिडिओ पर्यंत शूट करता येवू शकतो. वाचाः Oppo A16s चे अन्य फीचर्स हा फोन PowerVR GPU सोबत MediaTek Helio G35 चिपसेट येतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 256GB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज साठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉयड ११ वर आधारित ColorOS 11.1 वर काम करतो. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iNqbtz
https://ift.tt/3AC2uKC
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.