नवी दिल्ली : कोणत्याही कंपनीसाठी तिचे सर्वात महत्त्वाचे असते. कंपनीची वाढ ही एकप्रकारे कर्मचाऱ्यांवरच अवलंबून असते. जगातील सर्वोत्तम कंपन्यांचा उल्लेख येतो त्यावेळी गुगलचे नाव अवर्जून घेतले जाते. मात्र, असे असले तरी गुगलने आणि टूल्सचा चुकीचा वापर केल्याचे कारण देत मागील दोन वर्षात जवळपास ८० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. रिपोर्टनुसार, ज्या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली ते गुगलच्या काही टूल्सचा वापर करून इतर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवताना आढळले होते. वाचाः रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये गुगलने आधी २६ व त्यानंतर १८ कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे कारण देत नोकरीवरून काढले. २०२० मध्ये ३६ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली, कारण त्यांनी गोपनीय माहिती व्यवस्थित हाताळली नाही. मदरबोर्डच्या रिपोर्टनुसार, त्यांना असे डॉक्यूमेंट मिळाले आहे ज्यात आढळले की कर्मचाऱ्यांविरोधात लावण्यात आलेले १० टक्के आरोप सिस्टमच्या दुरुपयोगाचे आहेत. सिस्टमच्या चुकीच्या वापरामध्ये एखाद्या कर्मचारी अथवा यूजरचा डेटा पाहणे किंवा डेटामध्ये बदल करणे याचा समावेश आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ज्या गोष्टीचा उल्लेख केला जात आहे ती मालमत्ता अथवा संवेदनशील माहिती तपासणे, त्याचा दुरुपयोग करणे किंवा आयपी संदर्भात आहे. आपल्या यूजर्सच्या माहितीची विशेष काळजी घेत असते व तिसऱ्या व्यक्तीकडे माहिती पोहचणार नाही यासाठी प्रयत्न केला जातो. निवेदनात म्हटले आहे की, जाणूनबुजून असो अथवा न कळत, याप्रकारचे उल्लंघन कंपनीमध्ये कमी होते. याबाबत कर्मचाऱ्यांना वर्षभर प्रशिक्षण दिले जाते व काहीही चूक झाल्यास पूर्ण तपास करून योग्य ती कारवाई केली जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jukJuM
https://ift.tt/3lH30mC

