Type Here to Get Search Results !

छोटा पॅक मोठा धमाका! फक्त १८ रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळत आहे डेटा-कॉलिंग-एसएमएसची सुविधा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , , , , MTNL ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक दमदार प्लान्स आणत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या किंमतीत येणारे अनेक प्लान्स आहेत. आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या १८ रुपयांच्या प्लानची माहिती देत आहोत. यामध्ये डेटा-कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. वाचाः BSNL चा १८ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या फक्त १८ रुपयांच्या प्लानमध्ये इतर कंपन्यांपेक्षा अधिक चांगले फायदे मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २ दिवस आहे. एअरटेलच्या तुलनेत हा प्लान अधिक शानदार आहे. Airtel चा १९ रुपयांचा प्लान या प्लानची किंमत १९ रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि केवळ २०० एमबी डेटा मिळतो. प्लानची वैधता २ दिवस असून, यात एसएमएस सुविधा मिळत नाही. Vi चा १९ रुपयांचा प्लान वीआयच्या या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात एसएमएस बेनिफिट्स मिळत नाही. २ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iHuUN4
https://ift.tt/2VT8Dms
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.