Type Here to Get Search Results !

हॅकर्स चोरी करत आहेत खासगी माहिती, फसवणुकीपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ४ गोष्टी

नवी दिल्ली : सायबर गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यूजर्सची खासगी माहिती चोरी करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. तुमचा मोबाइल नंबर, ईमेल एड्रेस आणि बँकिंग माहिती चोरी केली जाते. त्यामुळे यापासून सावध राहणे गरजेचे आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. ट्विटरवर महाराष्ट्र सायबरने काही टिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली आहे. वाचा: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट बँकिंगसाठी स्वतःचा मोबाइल अथवा लॅपटॉप वापरायला हवा. म्हणजे तुम्ही जेव्हाही ट्रान्झेक्शनसाठी इंटरनेट बँकिंगचा उपयोग करत असाल तेव्हा स्वतःच्या पीसी अथवा मोबाइलचा वापर करावा. ऑनलाइन फॉर्म भरताना खासगी माहिती विचार करूनच शेअर करावी. अनेकदा आपण चुकीच्या साइटवर आपली खासगी माहिती देतो व त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. सोशल मीडियावर देखील आपले खासगी फोटो आणि माहिती उपलब्ध असते. त्यामुळे सोशल मीडिया व इतर खासगी प्रोफाइलवर देखील पर्सनल डिव्हाइसनेच लॉगइन करावे. याशिवाय प्रत्येक सेशननंतर लॉग आउट करायला विसरू नये. SMS, ईमेल अथवा सोशल मीडियावर येणाऱ्या धोकादायक व अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. अनेकदा अशा लिंकवर केल्यास गुन्हेगारांना डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय तुम्ही सुरू करू शकता व मजबूत पासवर्डने अकाउंट सुरक्षित ठेवता येईल. तसेच, बँक स्टेटमेंटला देखील वारंवार तपासावे. काहीही चुकीचे आढळल्यास तुम्ही त्वरित तक्रार करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fOMqNT
https://ift.tt/2U3KMA4
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.