Type Here to Get Search Results !

जिओचे ५ दमदार प्रीपेड प्लान्स, दिवसाला वापरा कितीही डेटा

नवी दिल्ली : आणि इतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांन विना डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर करत आहे. या प्लान्समध्ये यूजर्स कोणत्याही मर्यादेशिवाय दिवसाला कितीही डेटा वापरू शकतात. रिलायन्स जिओचे असेच पाच प्लान्स पाहुयात जे नो डेटा लिमिटसह येतात. वाचा: Jio चा १२७ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण १२ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएसची सुविधा मिळते. १५ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. Jio २४७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ३० दिवस असून, यात २५ जीबी डेटा नो डेली लिमिटसह मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. Jio चा ४४७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ६० दिवस असून, यात एकूण ५० जीबी डेटा मिळतो. यूजर्स एका दिवसात प्लानमध्ये मिळणारा कितीही डेटा वापरू शकतात. इतर बेनिफिट्स वरील प्लानप्रमाणेच आहेत. Jio चा ५९७ रुपयांचा प्लान या प्रीपेड प्लानमध्ये ९० दिवस वैधतेसह एकूण ७५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय वापरू शकता. इतर बेनिफिट्स वरील प्लान्स प्रमाणेच आहेत. Jio चा २,३९७ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान देखील नो डेली डेटा लिमिटसह येतो. याची वैधता ३६५ दिवस असून, यात ३६५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CrXhXA
https://ift.tt/3AqoEQ8
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.