Type Here to Get Search Results !

स्वस्तात मिळत आहे शानदार इयरफोन्स, सुरुवाती किंमत फक्त १३९ रुपये

नवी दिल्ली : गाणी ऐकायची असो अथवा कोणाशी फोनवर गप्पा मारायच्या असतील अशावेळी हेडफोन्स उपयोगी येतात. तुम्ही जर कमी किंमतीत येणारे हेडफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये अनेक कंपन्या बंपर डिस्काउंट देत आहे. १३९ रुपये सुरुवाती किंमतीत तुम्ही , खरेदी करू शकतात. अशाच काही स्वस्त हेडफोन्सविषयी जाणून घेऊया. वाचा: WeCool Moonwalk Mini In Ear Earbuds या इयरबड्सची किंमत १,९९९ रुपये आहे. मात्र १,२०० रुपये डिस्काउंटनंतर ७९९ रुपयात खरेदी करू शकता. हे इयरबड्स मॅग्नेटिक चार्जिंग केससोबत येतात. यामध्ये डिजिटल बॅटरी इंडिकेटर देण्यात आले आहे. सोबतच, सिक्योर स्पोर्ट्स फिटसाठी माइक देण्यात आले आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५ मिळेल. Tangent Lite Bluetooth 5.0 याची किंमत १,८०० रुपये आहे. मात्र, १,२०१ रुपये डिस्काउंटनंतर ५९९ रुपयात खरेदी करू शकता. यात Hi-Fi स्टेरियो साउंड मिळतो. तसेच, ८ तास प्लेटाइम, स्वेट रेसिस्टेंट, मॅग्नेटिक इयरबड्स, वॉइस असिस्टेंट आणि माइक देण्यात आला आहे. हे एक लाइटवेट एर्गोनिक नेकबँड आहे. pTron Pride Lite HBE (High Bass Earphones) in-Ear Wired या हेडफोन्सची किंमत ८९९ रुपये आहे. परंतु, ७०० रुपये डिस्काउंटनंतर १९९ रुपयात खरेदी करू शकता. हे स्टाइलिश डिझाइनसह येतात. याला एर्गोनिक इन-इयर डिझाइनसोबत सादर करण्यात आले आहे. सोबतच, यात १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स देखील मिळतात. हे वायर्ड इयरफोन्स आहेत. यात १.२ मीटरची लाँग ड्यूरेबल टँगल फ्री केबल मिळते. SNAIR Tunex 235S2 Wireless Headset या हेडसेटची किंमत २,९९० रुपये आहे, मात्र, २१९१ रुपये डिस्काउंटनंतर ७९९ रुपयात खरेदी करू शकता. हे हेडसेट Tunex २३५ s२ फीचरसह येतात व यामद्ये ब्लूटूथ ५ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली असून, २० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ८ तास वापरू शकता. हेडसेट पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतात. Zeb-Corolla In Ear Wired Earphone या इयरफोनची किंमत ३९९ रुपये आहे. मात्र, २६० रुपये डिस्काउंटनंतर १३९ रुपयात खरेदी करू शकता. यात मल्टी फंक्शन बटन आणि १.२ मीटर केबल मिळते. हे स्टाइलिश आणि लाइटवेट डिझाइनसह येतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37QbTC8
https://ift.tt/3iQN5A4
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.