Type Here to Get Search Results !

Airtel च्या या प्लानमध्ये फक्त ५ रुपयात १ जीबी डेटा, डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री

नवी दिल्लीः भारती एअरटेल आपल्या युजर्संना फक्त ५ रुपयांत १ जीबी डेटा देत आहे. या डीलला खास बनवण्यासाठी भारती एअरटेल सोबत ओटीटी बेनिफिट देत आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नवीन नवीन ऑफर आणत आहे. एअरटेलच्या या प्लानची किंमत दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. परंतु, नेटवर्क क्वॉलिटी मुळे युजर्स याकडे आकर्षित होतात. एअरटेल एक असा प्लान ऑफर करीत आहे, ज्यात फक्त ५ रुपयांत १ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय, डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये ५ रुपयांत १ जीबी डेटा युजर्संना मिळत आहे. हा प्लान ओटीटी सब्सक्रिप्शन सोबत येतो. म्हणजेच या प्लान सोबत युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसचे बेनिफिट्स दिले जाते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हा प्लान ज्या कस्टमर्संना जास्त डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. वाचाः या प्लानमध्ये प्रति जीबी डेटाचा विचार केला तर या प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची किंमत ४४८ रुपये आहे. याचाच अर्थ प्रति जीबी डेटा साठी जवळपास ५.३ रुपये खर्च करावे लागेल. याशिवाय, तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे एक वर्षांपर्यंत सब्सक्रिप्शन दिले जाते. टेलिकॉम कंपनी आता ५जी कडे जात आहे. यासाठी ५जी ची टेस्टिंग करीत आहे. दुसऱ्या टेलिकॉम कंपन्या सुद्धा ५ जीची टेस्टिंग करीत आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lynzRO
https://ift.tt/3jszpdw
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.