Type Here to Get Search Results !

Airtel फक्त १९ रुपयांत देत आहे डेटा आणि कॉलिंग, Jio-Vi टक्कर मिळणार? जाणून घ्या

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Airtel मार्केटमध्ये आपल्या प्रतिस्पर्धीला जोरदार टक्कर देत आहे. त्यासाठी कंपनी वेगवेगळे प्लान ऑफर करीत आहे. स्वस्त रिचार्ज पासून वार्षिक प्लानपर्यंत कंपनीच्या पोर्टफोलियोत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एअरटेलचा एक स्वस्त रिचार्ज प्लान असून त्याची किंमत फक्त १९ रुपये आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. यात युजर्संना डेटा आणि कॉलिंग सारखे बेनिफिट्स दिले जात आहे. जर तुम्ही एअरटेलचे युजर्स असाल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी १९ रुपयांच्या प्लान संबंधी माहिती देत आहोत. हा प्लान Reliance Jio किंवा Vodafone-Idea च्या प्लान्सला टक्कर देण्यात यशस्वी होईल का, जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Airtel चा १९ रुपयाचा प्लान हा कंपनीचा छोटा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधी दिली जाते. युजर्स या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करू शकतो. कॉलिंग शिवाय, डेटा बेनिफिट सुद्धा दिले जात आहे. यात युजर्संना 200MB डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २ दिवसाची आहे. वाचाः Jio चा सर्वात स्वस्त प्लान जिओचा सर्वात स्वस्त प्लान हा ३९ रुपयांचा आहे. हा जिओ फोन युजर्संसाठी आहे. यात युजर्संना १४ दिवसाची वैधता मिळते. सोबत १४०० एमबी डेटा दिला जातो. हा प्रतिदिन १०० एमबी डेटाच्या हिशोबानुसार दिला जाईल. सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचाः Vi चा सर्वात स्वस्त प्लान हा कंपनीचा सर्वात छोटा रिचार्ज आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्संना या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा दिली जाते. कॉलिंग शिवाय, डेटा बेनिफिट दिले जाते. यात युजर्संना 200MB डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lmq75C
https://ift.tt/3xkVH67
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.