नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया वेगवेगळा प्लान ऑफर करीत आहे. काही युजर्संना महिनाभराचा प्लान पसंत पडतो तर काहींना वर्षभराचा प्लान पसंत पडतो. परंतु, मोठ्या संख्येत असेही युजर्स आहेत. ज्यांना ५६ दिवस किंवा ८४ दिवसांचा प्रीपेड प्लान पसंत पडतो. आज आम्ही तुम्हाला या तिन्ही कंपन्यांच्या ५६ दिवसांच्या वैधतेच्या बेस्ट प्रीपेड प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः चा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लान कॉलिंग आणि डेटा सोबत ओटीटी सब्सक्रिप्शन सोबत येतो. यात ५६ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा दिला जातो. यात ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, एक वर्षासाठी Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन आणि जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः चा ५५८ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलचा हा प्लान ५६ दिवसांच्या वैधते सोबत येतो. परंतु, यात जिओ पेक्षा जास्त डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण डेटा १६८ जीबी मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Airtel Xstream प्रीमियम, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक सारख्या सुविधा दिल्या जातात. वाचाः चा ५९५ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या प्लानची किंमत आणि सुविधेत दोन्ही जिओच्या प्लानसारखाच आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये ५६ दिवसाची वैधता मिळते. रोज २ जीबी डेटा एकूण ११२ जीबी मिळतो. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. कंपनी ग्राहकांना विकेंड डेटा रोलओवर, बिंज ऑल नाइट आणि Vi Movies & TV Classic एक्सेस सोबत ZEE5 premium ची मेंबरशीप सुद्धा मिळते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s85kUz
https://ift.tt/3CvJCia

