नवी दिल्लीः TCL ने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात आपली सी सीरीज टीव्ही लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने C725, C825 आणि C728 बाजारात उतरवले आहेत. यात मिनी एलईडी आणि क्यूएलईडी डिस्प्ले, फ्रंट व्हिडिओ कॅमेरा, Onkyo बिल्ट-इन वूफर आणि Dolby Atmos सपोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. याची सुरुवातीची किंमत ६४ हजार ९९० रुपये आहे. जाणून घ्या यात काय काय फीचर्स दिले आहेत. वाचाः TCL C825 टीसीएलचे C825 मॉडल भारतात पहिले मिनी एलईडी ४के टीव्ही आहे. यात १००० निट्सचे ब्राइटनेस सपोर्ट सोबत आणले गेले आहे. हे अँड्रॉयड ११ टीव्ही वर काम करते. C825 मध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट दिला आहे. जो कंटेट आणि लाइटनिंग कंडिशन नुसार, पिक्चर मोड सेट करू शकते. यात एक एआय चिप दिली आहे. जी कंटेटचा व्हॅल्यूम कंट्रोल मॅनेज करण्यास मदत करते. वाचाः मिळतील हे फीचर्स TCL C825 स्मार्ट टीव्ही मध्ये Onkyo बिल्ट-इन वूफर आणि फ्रंट-फायरिंग स्पीकर सोबत व्हिडिओ कॉलसाठी वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. या टीव्हीला व्हाइस कंट्रोलचे युज करून ऑन करू शकते. TCL C825 च्या ५५ इंचाच्या टीव्हीची किंमत १ लाख १४ हजार ९९० रुपये आहे. वाचाः यांच्याशी होईल सामना TCL च्या या नवीन स्मार्ट टीव्हीची थेट टक्कर रियलमी, शाओमी, थॉमसन आणि कोडक सारख्या ब्रँड्स शी होईल. आता भारतात TCL च्या या स्मार्ट टीव्हीली किती पसंत केले जाते हे पाहणे उत्सूकतेचे आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wMC4Ud
https://ift.tt/2UkicL1

