नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक ट्विट करून सांगितले की, ही सर्विस १० जुलै आणि ११ जुलै रोजी काही वेळेसाठी बंद राहणार आहे. ने आपल्या खातेधारकांना अलर्ट केले आहे. त्यांची ऑनलाइन सर्विस (Online Services) एका निश्चित काळासाठी उपलब्ध असणार नाही. SBI भारतातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे याची परिणाम लाखो लोकांवर पडणार आहे. वाचाः SBI ची ही सर्विस बंद राहणार एसबीआयच्या युजर्संना ऑनलाइन सर्विस युज करता येणार नाही. SBI ची इंटरनेट बँकिंग (Internet Banking), योनो अॅप (YONO App), योनो लाइट अॅप (Yono Lite App) आणि यूपीआय (UPI) सर्विसेज काम करणार नाही. बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँक अपग्रेडेशन वर काम करीत आहे. त्यामुळे तुमचे जर नेट बँकिंग, यूपीआय आदी संबंधित काही काम करायचे असेल तर ते पूर्ण करून घ्या. वाचाः यावेळी बंद राहणार SBI ची सेवा SBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री १०.४५ ते ११ जुलै २०२१ च्या सकाळी १२.१५ पर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. सोबत एसबीआयने ट्विट मध्ये लिहिले की, आम्ही ग्राहकांना आवाहन करतो की, आमच्या या अडचणीच्या काळात आमच्यासोबत राहा. आम्ही चांगली बँकिग एक्सपीरियन्स देण्याचा प्रयत्न करीत आहोत. असुविधेसाठी आम्हाला खेद आहे. वाचाः काय आहे YONO अॅप ? YONO एक इंटिग्रेटेड डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. SBI यूजर्सला यात फायनान्शियल सर्विस सोबत दुसऱ्या अन्य सर्विस जसे फ्लाइट, ट्रेन, बस आणि टॅक्सी बुक करता येते. ऑनलाइन शॉपिंग किंवा मेडिकल पेमेंटचा वापर करता येवू शकतो. Android आणि iOS दोन्ही स्मार्टफोनवर YONO सहज चालवता येऊ शकते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T2aKDH
https://ift.tt/3k4MDzq

