Type Here to Get Search Results !

६०००mAh बॅटरीसह येणाऱ्या Samsung Galaxy F२२ चा पहिला सेल आज, किंमत फक्त...

नवी दिल्ली : ची आजपासून (१३ जुले) भारतात विक्री सुरू होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, ६००० एमएएचची बॅटरी आणि ९० हर्ट्ज डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतील. हा फोन आणि रियलमी नार्झो ३० सारख्या फोन्सला टक्कर देईल. Galaxy F22 च्या ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. फोन डेनिम ब्लू आणि डेनिम ब्लॅक रंगात येतो. वाचाः ग्राहक या स्मार्टफोनला आजपासून फ्लिपकार्ट आणि इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकतात. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत प्रीपेड ट्रांझॅक्शन्सवर १ हजार रुपये सूट दिली जात आहे. सोबतच, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑप्शन्सचा देखील पर्याय मिळेल. Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स हा फोन अँड्राइड ११ वर आधारित One UI ३.१ वर चालतो व यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत ६.४ इंच HD+ (७००x१६०० पिक्सल) sAMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६ जीबी पर्यंत रॅमसोबत MediaTek Helio G८० प्रोसेसर मिळतो. वाचाः गॅलेक्सी एफ२२ मध्ये फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. मात्र, कंपनीने बॉक्समध्ये १५ वॉटचा चार्जर दिला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बाजूला देण्यात आले आहे. यात Samsung Pay Mini सपोर्ट देखील मिळेल. याची इंटर्नल मेमरी १२८ जीबीपर्यंत आहे. कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. सोबतच, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kbJg9H
https://ift.tt/3B7l4eS
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.